Menu Close

निषेध करा : आॅनलाइन विकले जात आहे ‘ॐ’ चिन्ह असलेले जोडे आणि श्री गणेशाचे चित्र असलेली बीयर

नवी देहली : अमेरिकेच्या दोन ऑनलाइन रिटेलर कंपन्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीअरच्या बॉटलवर गणपतीचा फोटो आणि बुटांवर ओम लिहिलेले निशाण वापरल्यामुळे या कंपन्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. yeswevibe.com आणि lostcoast.com अशी या वेबसाइटची नावं आहेत.

भारत स्काउट्स अॅन्ड गाइड्सचे कमिश्नर नरेश कडयान यांनी याबाबत तक्रार दाखल केली. याबाबत त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहूनही कळवले आहे. या प्रकरणी देहलीच्या प्रशांत विहार पोलीस स्थानकात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीसी कलम २९५ अ आणि १५३ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुर्वी कॅनडातील अॅमेझॉनच्या वेबसाइटवरही तिरंगा असलेल्या पायपुसणीची विक्री सुरू होती. त्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनच्या एकाही अधिका-याला व्हिसा देणार नाही अशी धमकी दिल्यावर अॅमेझॉनने माफी मागितली होती.

धर्माभिमानी हिंदु वैध मार्गने याचा विरोध करत आहेत :

१. Lostcoastbrewer

Twitter : Twitter.com/lostcoastbrewer
पत्ता : LOST COAST BREWERY
1600 Sunset Dr. Eureka, CA 95503
संपर्क क्रमांक : (707) 445-4484

२. Yeswevibe

Email : [email protected]

संदर्भ : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *