Menu Close

जोधपूर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाद्वारे जनजागृती !

जोधपूर : प्रतिवर्षी आयोजित होणार्‍या पश्‍चिम राजस्थान उद्योग हस्तशिल्प उत्सवात यंदा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. जोधपूर येथील रावण का चबुतरा या मैदानात ७ ते १७ जानेवारी या कालावधीत या प्रदर्शन आयोजित केले होते. हिंदु जनजागृती समितीने लावलेले धर्मशिक्षण, धर्माचरण आणि गोरक्षण यांविषयीचे फलक प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. अनेकांनी जिज्ञासेने या फलकांवरील माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन लावण्यासाठी जोधपूर इंडस्ट्रियल असोसिएशनचे श्री. विनोदसिंह राजपुरोहित आणि अधिवक्ता श्री. मोतीसिंहजी राजपुरोहित यांनी सहकार्य केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *