तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे शिवजयंतीनिमित्त शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने मार्गदर्शन
तुुळजापूर (जिल्हा धाराशिव) : ज्या पद्धतीने जिजाऊंनी शिवबाराजेंना घडवले, त्याचप्रमाणे हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या मुलाला घडवायला हवे. आज प्रत्येक मातेला आपला मुलगा अभियंता, वैद्य, अधिवक्ता व्हावा, असे वाटते; मात्र जिजाऊंना आपला मुलगा धर्मयोद्धा व्हावा, असे वाटत होते आणि त्यांनी शूरवीर शिवाजी महाराजांना जन्म दिला. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी समस्त हिंदु बांधवांना केले. येथील शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त त्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले . . .
१. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज आपल्याला धर्मांधांची चाकरी करावी लागली असती. ज्यांच्या डोक्यावर आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे, त्याचा केस कोणीही वाकडा करू शकत नाही. प्रत्येक हिंदु तरुणाने भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. प्रत्येकाने वीर योद्धा होणे आवश्यक आहे.
२. सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या मुलाचे नाव १० सहस्र हिंदूंचे रक्त सांडणा-या हिंदुद्वेषी तैमूर याचे नाव ठेवण्यात आले, ही या राष्ट्रातील हिंदु धर्मियांची शोकांतिका आहे.
३. आज लव्ह जिहादच्या माध्यमातून लक्षावधी तरुणींचे धर्मांतर केले जात असून त्यांच्यापासून होणा-या संततीचा उपयोग जिहादसाठी केला जात आहे. त्यासाठी प्रत्येक मातांनी आपल्या मुलींना धर्मशिक्षण दिले पाहिजे.
४. पशूवधगृहांच्या माध्यमातून गोमातेची हत्या पुष्कळ प्रमाणात होत आहे. हिंदु तरुणांनी गोमातेचेही रक्षण केले पाहिजे.
मार्गदर्शनापूर्वी श्री. राजासिंह ठाकूर श्री भवानीदेवीचे दर्शन घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सहस्रो तरुणांच्या समवेत भवानीज्योत घेऊन ढोल-ताशांच्या गजरात सभास्थळी उपस्थित झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता निलेश सांगोलकर यांनी केले. प्रमुख वक्त्यांच्या हस्ते श्री भवानीदेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अन् दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपिठावर आमदार श्री. राजासिंह ठाकूर, महंत तुकोजी महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज आणि शिवसेनेच्या सौ. श्यामलताई पवार उपस्थित होते. या वेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ४ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अनुमतीसाठी १८ फेब्रुवारी या दिवशी स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. त्यासाठी २ दिवस पाठपुरावा चालू होता. कार्यक्रमाच्या दिवशी मात्र आयोजकांना बोलावून अनुमती मिळणार नसून कार्यक्रम रहित करण्याविषयी सांगण्यात आले. शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन दबाव निर्माण केला. त्यानंतर अनुमती देण्यात आली. या वेळी तुळजापूर येथील पोलीस निरीक्षक श्री. बोकडेसाहेब म्हणाले की, जिल्हाधिकारी साहेबांनी मला अनुमती न देण्याविषयी सांगितले होते. संबंधित अधिका-यांच्या स्पष्ट न बोलणे, टाळाटाळ करणे, उडवाउडवीची उत्तर देणे अशा वृत्तीमुळे कार्यक्रमाच्या दिवशी अनेक हिंदुत्वनिष्ठांंचा वेळ वाया गेला.
क्षणचित्रे
१. वक्त्यांचे मार्गदर्शन चालू असतांना उपस्थित धर्माभिमान्यांकडून धर्माभिमान जागृत करणा-या घोषणा उत्स्फूर्तपणे दिल्या जात होत्या.
२. सभेनंतर अनेक तरुणांनी प्रमुख वक्त्यांना भेटण्यासाठी व्यासपिठाजवळ पुष्कळ गर्दी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात