Menu Close

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा : येथे २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. त्या माध्यमातून मद्य-मांस यांची विक्री करणा-या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणा-यांचा निषेध घोषणा देऊन करण्यात आला. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून हज यात्रेला देण्यात येणारे अनुदान रहित करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस आणि कालमर्यादा घालून कृती करावी. तसेच केरळमध्ये धर्मांधांकडून होणा-या हिंदु नेत्यांचा हत्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात यावा, अशी मागणी येथील जिल्हाधिकारी शैलेश नावल यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसाठीही निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *