मंत्र्यांनी असे भावनिक आवाहन करणे कितपत योग्य ? कोट्यवधी रुपये खर्चूनही गंगानदी आजपर्यंत प्रदूषणमुक्त का झाली नाही, याचे उत्तर देणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लक्ष्मणपुरी : केंद्रात आमचे सरकार आल्यापासून युद्धस्तरावर गंगानदीची स्वच्छता करण्यात येत आहे. गंगानदीचे पाणी निर्मळ करणे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. जर नियोजित वेळेत गंगानदीची स्वच्छता झाली नाही, तर मी प्राणत्याग करीन, असे विधान केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी केले आहे. उमा भारती यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसच्या तत्कालीन सरकारमुळे गंगानदीच्या स्वच्छतेमध्ये सरकारी धनाची लुट करण्यात आली. त्यामुळे गंगानदीची स्वच्छता होऊ शकली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात