चोपडा (जिल्हा जळगाव) : येथील तहसील कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या . . .
१. मद्य-मांस विक्री करणार्या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणे, तसेच व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे, हा गुन्हा असून तसे करणार्या व्यापार्यांवर गुन्हा प्रविष्ट करून कारवाईही करावी.
२. हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस उपाय करून कालमर्यादा घालून कृती करावी.
३. केरळमध्ये धर्मांधांकडून होणार्या हिंदु नेत्याच्या हत्यांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात यावा.
४. संसदेत गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडणार्या होणारी आर्थिक हानी खासदारांच्या वेतनातून वसूल करावी.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात