Menu Close

मंगळुरू (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मंगळुरु येथे आंदोलन करतांना धर्माभिमानी

मंगळुरू (कर्नाटक) : १९ फेब्रुवारी या दिवशी मंगळुरू येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या वेळी हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करावे, तेलंगणमध्ये मुसलमानांना देण्यात येणारे १२ प्रतिशत आरक्षण रहित करावे, केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा विरोध आणि संसदेमध्ये गदारोळ करून होणारी वेळ आणि पैसे यांची हानी रोखणे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. चंद्रा मोगेरे, श्री. विवेक पै आणि कुमार मालेमार यांच्यासहित अनेक धर्माभिमानी या आंदोलनात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *