कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी केलेले बलीदान आपण विसरलो आहोत. महाराजांनी प्रत्येक मोहिमेच्या पूर्वी भवानीदेवीचे आशीर्वाद घेऊन तिची उपासना केली, त्याप्रमाणे आपल्याला ईश्वराची उपासना करायला हवी. आज छत्रपती शिवाजी महाराज घडायचे असतील, तर प्रथम जिजाऊ निर्माण व्हायला हवी. त्यासाठी धर्मशिक्षण आणि धर्माचरण महत्त्वाचे आहे. सध्याच्या स्थितीत महाराजांचे चरित्र ऐकण्याची नव्हे, तर कृतीत आणण्याची आवश्यकता आहे, असे मत भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
तळोजा येथील शिरढोण गावात शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास ११० ग्रामस्थ उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. मुलांनी केवळ ४ दिवसांत शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
२. पहिलेच वर्ष असूनही मुलांनी पोवाडे आणि व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
३. ग्रामस्थांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात