कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
कोल्हापूर : देशात धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी शब्द वापरणाऱ्यांनी सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्व धर्मांना समान वागणूक दिली पाहिजे, तसेच मुसलमानांना त्यांच्या शरीयत कायद्याचा वापर करण्यास केंद्र शासनाने अनुमती देऊ नये. केरळमधील धर्मांधांकडून होणार्याय हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या प्रकरणांचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ श्री. गोविंदराव देशपांडे यांनी २५ फेब्रुवारी या दिवशी केली. येथील शिवाजी चौकात आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते.
‘मद्य-मांस विक्री करणाऱ्यां दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करावा, हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहित करावे, बंगाल येथील पाठ्यपुस्तकांत असलेली देवतांची नावे असलेले शब्द हिंदुद्वेषापोटी पालटणाऱ्यां बंगाल पाठ्यपुस्तक मंडळातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि पालटलेले शब्द पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावेत यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
सहभागी हिंदुत्वनिष्ठ…
शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख सर्वश्री राजू यादव, शशी बिडकर, इस्कॉनचे महेंद्रकुमार साळोखे, गणेश नरके, हिंदुत्वनिष्ठ गोविंदराव देशपांडे, देवराज सहानी, राहुल भोई, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, रणरागिणीच्या कार्यकर्त्या, सनातन संस्थेचे साधक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात