Menu Close

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पनवेल तहसीलदारांना निवेदन

panvl_clr
तहसीलदारांना निवेदन देतांना राष्ट्राभिमानी

पनवेल : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी होणारी राष्ट्राध्वजाच्यी विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना देण्यात आले. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखला जावा, यासाठी सर्व संबंधितांंना सूचना देऊ, तसेच याविषयी जनजागृती होण्यासाठी परिसरातील सर्व चित्रपटगृहांत प्रबोधनात्मक दृश्यफीत दाखवण्यासाठी सांगू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी शिरढोण शिवसेना कार्यकर्ते श्री. मंगेश भोईर, येथील समितीचे कार्यकर्ते श्री. विनायक वाकडीकर, श्री. मच्छिंद्र पवार, पनवेल येथील श्री. मिलींद पोशे, डॉ. भरत बुगडे उपस्थित होते. तहसीलदारांनी समितीच्या कार्यकर्त्यांकडे प्रबोधनपर दृश्यफीत असल्यास ती सादर करण्यासही सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *