‘डीजे व्हॅन’ची मोडतोड, एक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता गंभीर घायाळ
उत्तरप्रदेशच्या समाजवादी सरकारने अतीलांगूलचालन केल्यामुळे उद्दाम झालेल्या धर्मांधांचे दुष्कृत्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
उन्नाव (उत्तरप्रदेश) : महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे शोभायात्रा काढण्यात येते. त्यात सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून मिरवणूक काढत निघालेल्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांवर धर्मांधांनी ईदगाह भागात जोरदार दगडफेक केली. यात मिरवणुकीतील ‘डीजे व्हॅन’ची मोडतोड झाली, तसेच एक कार्यकर्ता गंभीर घायाळ झाला. या घटनेची वार्ता शहरात पोचताच मोठ्या प्रमाणात हिंदूंनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी हिंदूंनी पोचू नये, यासाठी पोलिसांनी सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली. (हिंदू घटनास्थळी पोचू नये; म्हणून नाकाबंदी करणारे पोलीस हिंदूंच्या मिरवणुकीवर धर्मांध दगडफेक करत असतांना कुठे होते ? धर्मांधांसमोर नांगी टाकणारे पोलीस नेहमीच हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठांनी धर्मांधांच्या विरोधात तक्रार केली आहे. (हिंदूंंचे सण आणि उत्सव उत्साहात साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. शिवरात्रीच्या निमित्ताने शहरात काढण्यात येणार्या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी ‘हिंदु युवा वाहिनी’चे कार्यकर्ते दुचाकींसह मिरवणूक काढत ईदगाह भागातून जात होते.
२. ही मिरवणूक येथील आईसा मशिदीजवळ येताच धर्मांधांनी ‘डीजे’चा आवाज बंद करून शांततेत जाण्याची कार्यकर्त्यांना चेतावणी दिली. (सकाळ-दुपार-संध्याकाळ बांग देऊन हिंदूंना त्रास देणार्या धर्मांधांना हिंदूंच्या मिरवणुकीत वाजवण्यात येणारा ‘डीजे’चा त्रास होतो, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याला कार्यकर्त्यांनी नकार दिला. त्यानंतर धर्मांधांकडून ‘डिजे व्हॅन’सह मिरवणुकीचा रस्ता अडवण्यात आला. त्यामुळे दोन गटांत वाद निर्माण झाला. तेवढ्यात जवळच्या घरांमधून धर्मांधांनी दगडफेक चालू केली. याला हिंदूंनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
३. पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे संतप्त झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लखनऊ-कानपूर महागार्ग रोखून धरला. प्रशासकीय अधिकार्यांनी हिंदूंना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तणाव निवळला. (हिंदूंची समजूत काढल्यावर ते सहकार्य करतात; मात्र धर्मांध कोणतीही तडजोड न स्वीकारता प्रशासनाला सळो कि पळो करून सोडतात. त्यामुळे प्रशासनही त्यांना दबून असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात