चेन्नई – येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र पनून कश्मीर प्रांत निर्माण करण्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले. यात शिवसेना, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), भारत हिंदु मुन्नानी, अ.भा. हिंदु महासभा, हिंदु मक्कल मुन्नानी, हिंदु सत्यसेना, अ.भ. हिंदु सत्य सेवा, हिंदु जनजागृती समिती आदी २० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १२० धर्माभिमानी सहभागी झाले होते. या वेळी पनून कश्मीरच्या मागणीचे निवेदन पंतप्रधान यांच्यानावाने तमिळनाडूच्या राज्यपालांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीकडून श्री. विनायक शानभाग, श्री. जयकुमार, सौ. सुगंथी जयकुमार आणि सौ. उमा रविचंद्रन् यात सहभागी झाले होते.
चेन्नई येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांंकडून पनून कश्मीरसाठी आंदोलन
Tags : Hindu Janajagruti SamitiHindu OrganisationsProtest by Hindusकाश्मीर प्रश्नपनून कश्मीरहिंदूंच्या समस्या