दुशाम्बे (तझिकिस्तान) : दहशतवाद्यांसारखे दिसू नये म्हणून येथील पोलिसांनी १३ हजार पुरुषांची दाढी कापल्याचे समोर आले आहे. एका माहितीनुसार तझिकिस्तानातील सुमारे २००० हून अधिक फायटर सिरियात ISIS मध्ये सहभागी झाले आहेत. वेस्टर्न मीडियामध्ये तझिकिस्तानच्या सरकारचे हे पाऊल दहशतवादाचा सामना करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल समजले जात आहे.
मुलींना म्हटले, स्कार्फ लावाल तर तुम्हाला एलियन समजू
– साऊथ-वेस्ट खतलून रीजनचे पोलिस चीफ बहरोम शरीफजोदा म्हणाले की, लॉ एन्फोर्समेंट सर्व्हीसेसने १७०० हून अधिक महिला आणि मुलीनाही स्कार्फ परिधान करू नये म्हणून राजी केले आहे.
– त्याशिवाय पारंपरिक मुस्लीम कपडे विकणारी सुमारे १६० पेक्षा अधिक दुकाने बंदही केली आहेत.
– रेडियो लिबर्टीच्या रिपोर्टनुसार देशात हेडस्कार्फ परिधान केलेल्या ८९ वेश्यांनाही अटक करण्यात आली आहे.
– तझिकिस्तान हा एक मुस्लीम देश आहे. पण हा देश स्वतःला धर्मनिरपेक्ष देश मानतो.

राष्ट्रपतीच्या आदेशावरून…
– नवा कायदा राष्ट्रपती अमोमाली रहमॉन यांनी लागू केला आहे.
– रेहमॉन, सेक्युलिरिझमच्या प्रसारासाठी प्रसिद्ध आहेत.
– गेल्या आठवड्यातच देशाच्या संसदेने अरबी लहेजा असलेल्या परदेशी नावांवरही बंदी लावण्याबाबत मतदान घेतले होते.
– रेहमॉन, सेक्युलिरिझमच्या प्रसारासाठी प्रसिद्ध आहेत.
– गेल्या आठवड्यातच देशाच्या संसदेने अरबी लहेजा असलेल्या परदेशी नावांवरही बंदी लावण्याबाबत मतदान घेतले होते.
गेल्याववर्षी राजकीय पक्षांवर लावली होती बंदी
– सप्टेंबर २०१५ ला सुप्रीम कोर्टाने देशाच्या एकमेव रजिस्टर्ड ‘इस्लामिक पॉलिटिकल पार्टी’ वर बॅन लावला होता.
– पार्टीने निवडणुकीत एकही जागा न जिंकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
– रहमॉन १९९२ पासूनच देशाचे हेड ऑफ स्टेट आहेत.
– १९९४ पासून ते राष्ट्रपती पदावर आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२० मध्ये संपेल.
– पार्टीने निवडणुकीत एकही जागा न जिंकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
– रहमॉन १९९२ पासूनच देशाचे हेड ऑफ स्टेट आहेत.
– १९९४ पासून ते राष्ट्रपती पदावर आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२० मध्ये संपेल.
संदर्भ : दिव्य मराठी