- पाद्य्राचे हे विधान असहिष्णुतेचे दर्शक आहे, असे एकतरी पुरोगामी आणि लेखक पुढे येऊन सांगेल का ?
- धर्माभिमानी हिंदूंनी पाश्चात्त्यांचे अनुकरण करून पेहराव करणार्यांच्या विरोधात विधान केले, तर त्यांच्यावर आगपाखड करणारे पुरोगामी पाद्य्राच्या विरोधात तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
थिरुवनंतपुरम् : जीन्स आणि टी-शर्ट परिधान करणार्या तरुणींना अन् महिलांना दगड बांधून समुद्रात बुडवले पाहिजे, असे विधान केरळमधील फादर डॉमिनिक वलनमनल या पाद्रीने केले आहे. महिला असा वेश यासाठीच परिधान करतात; कारण पुरुषांना चेतवले जाईल, असेही ते म्हणाले. (तोकडे कपडे घातल्यामुळे पुरुषांच्या मनात वाईट विचार येतात, हे अनेकदा सांगण्यात येत असूनही पुरोगाम्यांकडून अशा विधानांना विरोध केला जातो आणि पुरुषांनी स्वतःची मनोवृत्ती पालटावी, असा सल्ला दिली जातो. तसा सल्ला आता ते पाद्रीला देणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाद्य्राच्या या विधानाची चित्रफीत सामाजिक माध्यमातून (सोशल मिडीयावरून) प्रसारित होत आहे. ही चित्रफीत शालोम टीव्हीवरून घेण्यात आली आहे. ही चित्रफीत जास्मिन नावाच्या मुलीने शेअर केली असून ती यू ट्यूब संकेतस्थळावर ११ मासांपूर्वीच पोस्ट करण्यात आली आहे.
चित्रफितीत पाद्य्राने केलेली विधाने . . .
१. जेव्हा मी एखाद्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातो, तेव्हा तेथे उपस्थित काही महिलांमुळे चर्चमधून बाहेर जावेसे वाटते; कारण इतरांना आकर्षित करण्यासाठी महिला जीन्स आणि टी-शर्ट परिधान करून तेथे येतात. त्यांच्या हातात भ्रमणभाष संच असतो, केस मोकळे असतात. मला समजत नाही की, चर्चमध्ये अशा पेहराव्याची काय आवश्यकता आहे ? कॅथलिक चर्च पुरुषांचे कपडे महिलांना परिधान करण्याची अनुमती देते का ?
२. जर तुम्ही असे करत आहात, तर तुम्ही देवाचा अवमान करत आहेत. तुम्ही देवाच्या विरोधात कृती करत आहात, तर तुम्हाला देवाची दया का हवी ?
३. अनेक तरुण माझ्याकडे येतात आणि सांगतात की, चर्चमध्ये येणार्या महिला अर्धनग्न कपडे परिधान करतात. त्यामुळे आमच्याकडून पाप घडते.
४ . बायबल असे म्हणते, जे तुम्हाला पापे करण्यास उद्युक्त करतात त्यांच्या शरीराला दगड बांधून समुद्रात खोल बुडवून टाका. म्हणजेच ज्या महिला पुरुषांची वासना चेतवत असतील त्या पापी आहेत.
ख्रिस्त्यांच्या विरोधातील वृत्त दडपणारी ढोंगी निधर्मी प्रसारमाध्यमे !
पाद्य्राच्या या चित्रफितीचे वृत्त काही मोजक्याच दैनिकांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाले आहे. याचाच अर्थ अन्य दैनिक आणि वृत्तवाहिन्या यांनी जाणीवपूर्वक हे वृत्त दडपले आहे, हे लक्षात येते !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात