Menu Close

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या मागणीवरुन सनी लिआेन चे निरोधचे विज्ञापन करणारे फलक हटवले जाणार !

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या प्रयत्नांना यश

या यशाविषयी ईश्‍वराकडे कृतज्ञता व्यक्त करा !

पणजी : गोव्यातील कदंब महामंडळाच्या बसगाड्या, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांवरील अभिनेत्री सनी लियोन हिची छायाचित्रे असणारी निरोध आणि गर्भनिरोधक गोळ्यांचे विज्ञापन असणारे फलक त्वरित हटवावेत, अशी नोटीस गोवा राज्य महिला आयोगाने कदंब महामंडळ, तसेच राज्यातील दोन्ही जिल्हाधिकार्‍यांना पाठवली आहे. गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अधिवक्ता सौ. विद्या शेट म्हणाल्या, ‘‘अशा पद्धतीने महिलांचा अवमान सहन केला जाणार नाही. महिलांना अयोग्य पद्धतीने दाखवणारे बसगाड्यांवरील, तसेच अन्य ठिकाणचे विज्ञापनफलक त्वरित हटवण्यास सांगण्यात आले आहे.’’

हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या शिष्टमंडळाने यांची २८ फेब्रुवारी या दिवशी अधिवक्ता सौ. विद्या शेट तानावडे यांची भेट घेऊन हे विज्ञापनफलक हटवण्याची मागणी केली होती. निरोध आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विज्ञापनफलकावर महिलांना वस्तू म्हणून प्रदर्शित केले जाते. सार्वजनिक स्थळांवर प्रदर्शित या अश्‍लील विज्ञापनांमुळे महिलांना लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, असे ‘रणरागिणी’चे म्हणणे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *