भारतातील एकतरी लेखक हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी असे बोलतो का ?
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीच्या वेळी पाकमध्ये इस्लाम व्यतिरिक्त हिंदु, शीख, ख्रिस्ती, पारशी हे धर्मीय असल्याने चांगले धार्मिक संतुलन होते; मात्र आता त्यांची संपूर्ण लोकसंख्या २३ टक्क्यांवरून ३ टक्के इतकी झाली आहे. हा एक अत्यंत धीम्या गतीने होत असलेला नरसंहार आहे. हा नरसंहार एका दिवसात किंवा एका महिन्यात झालेला नाही. तो हळूहळू होत आहे. या धर्मियांना अत्यंत क्रूरतेने नष्ट करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानी लेखिका, पत्रकार आणि नेत्या असलेल्या फरहनाज इस्पहानी यांनी केले आहे.
इस्पहानी पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानात हिंदु विवाह विधेयक संमत करणे, दीपावलीनिमित्त सरकारी सुटी देणे या घटना केवळ डोळ्यांत धूळ फेकणार्या आहेत; कारण देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्यांवर लक्ष देण्यासाठी सध्याच्या सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात