Menu Close

चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहवू – इसिसची धमकी

चीनमधील अल्पसंख्यांक उइगुर समुदायातील इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित कट्टरवाद्यांनी परत येऊन चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहविण्याची धमकी दिली आहे. इसिसने चीनला दिलेली ही पहिली धमकी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोमवारी इसिसने प्रसृत केलेल्या अर्ध्या तासाच्या एका व्हिडियोत ही धमकी देण्यात आली आहे. हा व्हिडियो पश्चिम इराकमधील इसिसच्या एका शाखेने प्रसृत केला आहे. यात उइगुर समुदायाच्या कट्टरवाद्यांना दाखविण्यात आले आहे, असे या व्हिडियोचे विश्लेषण करणाऱ्या साईट या अमेरिकी संस्थेने म्हटले आहे.

या व्हिडियोत उइगुर दहशतवादी एका तथाकथित खबऱ्याचा शिरच्छेद करताना दाखविला आहे. शिरच्छेद करण्यापूर्वी तो चीनला धमकी देताना दिसतो. साईटने दिलेल्या अनुवादानुसार, हा दहशतवादी म्हणतो, “चीनी लोकहो, लोक काय म्हणतात हे तुम्हाला कळत नाही ! आम्ही खिलाफतीचे सैनिक आहोत आणि आम्ही तुमच्याकडे येऊ आणि हत्यारांची भाषा काय असते, हे तुम्हाला सांगू. आम्ही रक्ताच्या नद्या वाहवू आणि दडपशाहीचा बदला घेऊ.”

चीनच्या पश्चिमेल्या असलेल्या शिनचियांग प्रांतात होणाऱ्या हिंसेकरिता उइगुर फुटीरवादी हे जबाबदार आहेत, असे चीनचे म्हणणे आहे. तर चीन सरकार आमचे सामाजिक आणि सांस्कृतिक दमन करते आणि प्रत्येक पातळीवर आमच्याशी भेदभाव होतो, असे या फुटीरवाद्यांचे म्हणणे आहे.

चीनला इसिसकडूम मिळालेली ही पहिली स्पष्ट धमकी आहे, असे ऑस्ट्रेलियन नॅशनल यूनिव्हर्सिटीच्या नॅशनल सिक्युरिटी कॉलेजमधील तज्ज्ञ डॉ. माइकल क्लार्क यांनी सांगितले. “ही पहिलीच वेळ आहे, की उइगुर भाषकांनी इसिसशी संबंधित असल्याचा दावा केला आहे,” असे ते म्हणाले.

संदर्भ : माझा पेपर

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *