महू : अनेक संघटना कार्य करीत असूनही हिंदूंवरील अन्याय दिवसेंदिवस वाढतच आहे; कारण हिंदु संघटना हिंदु समाजाला धर्माशी जोडण्यास अल्प पडल्या. आज हिंदूंसाठी पुढाकार घेऊन कार्य करणारे स्वार्थ, पद, प्रतिष्ठा यांत अडकले आहेत. याउलट धर्मांध धर्माच्या नावावर संघटित होऊन हिंदूंवर अन्याय करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले; कारण त्यांच्या पाठी उपासनेचे म्हणजे धर्माचे बळ होते. त्यांना संतांचा आशीर्वाद होता. अशाच प्रकारे जेव्हा आपण हिंदुत्वाचे कार्य कोणतीही अपेक्षा न ठेवता धर्मसेवा म्हणून करू, तेव्हा खर्या अर्थाने धर्मरक्षणाचे कार्य होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी केले.
या वेळी देशातील विविध राज्यांत हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाची माहिती उपस्थितांना देऊन समितीचे श्री. आनंद जाखोटिया म्हणाले, आज हिंदूंसमोर प्रतिदिन नवीन समस्या निर्माण होत आहेत; पण या समस्यांच्या विरोधात लढणारे केवळ मुठ्ठीभर आहेत. या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हे ऐकमेव उत्तर आहे. त्यामुळे सर्वांनी धर्माचरण करून हिंदु राष्ट्रासाठी सर्व भेद विसरून संघटित व्हायला हवे. समिती हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संघटनांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे.
क्षणचित्रे
समितीच्या संकेतस्थळाचे वाचक आणि हिंदु युवा वाहिनीचे महु विद्यार्थी प्रमुख श्री. साहिल सागर यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होते.