Menu Close

उज्जैन (मध्यप्रदेश) : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन !

महाशिवरात्रीनिमित्त उज्जैन येथील विश्‍वप्रसिद्ध श्री महाकाल मंदिरात अध्यात्मप्रसार !

उज्जैन (मध्यप्रदेश) : महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथील विश्‍वप्रसिद्ध श्री महाकाल मंदिरात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अध्यात्मप्रसार करण्यात आला. मंदिराच्या निर्गम मार्गावर संस्थेच्या वतीने एक कक्ष उभारून त्यात भगवान शिव, आचारधर्म, देवालय दर्शन या संदर्भात फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातन संस्था प्रकाशित विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक पूजोपयोगी वस्तूंचे विक्री केंद्रही उभारण्यात आले होते. त्याचा जिज्ञासूंनी लाभ घेतला. उज्जैनप्रमाणे गुमाष्टानगर, इंदौर येथील शिव मंदिरातही महाशिवरात्रीच्या निमित्ताने फ्लेक्स फलक आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.

क्षणचित्र : एका व्यक्तीने प्रदर्शनी बारकाईने पाहिली आणि त्या द्वारे होत असलेल्या जागृतीविषयी संस्था अन् समितीचे मनःपूर्वक आभार मानले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *