Menu Close

जर्मनी : शाळेत नमाज पढण्यावर बंदी

बर्लिन : मुस्लिम विद्यार्थी शाळेच्या इमारतीतच सामुहिक नमाज पढत असल्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याने पश्चिम जर्मनीतील वुप्परटल शहरातील एका शाळेने त्यावर बंदी घातली आहे.

मुस्लिम विद्यार्थ्यांना सर्वांना दिसेल अशा पद्धतीने हे नमाज पढले जातात. तसेच, स्वच्छतागृहांमधील त्यांचे विधी, नमाजासाठी चटया टाकणे, ठराविक आसनांत बसणे. सार्वजनिक ठिकाणी याला परवानगी नाही, असा अंतर्गत संदेश या शाळेतील शिक्षकांना देण्यात आला आहे.

एएफडी या मुस्लिमविरोधी पक्षाने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. या आदेशात म्हटले आहे की, तसेच, नमाज पढणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे निश्चित करून ती शाळा व्यवस्थापनाला कळवावीत, असे आदेशात म्हटले आहे.

ही बंदी मैत्रीपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगावी, असे शाळेने शिक्षकांना सांगितले आहे. जिम्नॅशियम योहानेस राऊ असे या शाळेचे नाव आहे. अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाने तत्परतेने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, “शाळेच्या वतीने हा एक चांगला आणि आमच्या मते सयुक्तिक पुढाकार आहे.”

संदर्भ : सकाळ

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *