गडचिरोली : येथे १ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी एस्.आर्. नायक यांना निवेदन देण्यात आले. तसेच या वेळी जनआक्रोश सभेचेही आयोजन करण्यात आले होते. सभेत शहरातील, तसेच शहराबाहेरील हिंदुत्वनिष्ठ आणि तसेच सामाजिक संघटनांचे प्रमुख अन् कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांनी सभेत केरळ सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
माजी आमदार अतुल देशकर म्हणाले, केरळ येथील साम्यवाद्यांचे सरकार हिंसाचाराला प्रोत्साहन देते. देशद्रोही विचारसरणी असलेल्या सरकारला निरपराध लोकांचे बळी घेऊन आसुरी आनंद मिळतो. अशा घातक विचारसरणीविरुद्ध सर्व भारतियांनी एकत्र यायला हवे. स्वदेश जागरण मंचाचे श्री. मनोज अलोनी यांनी सांगितले, आज भारतात राहून देशद्रोही कार्यवाही करणार्याल विचारांना काही तेथील शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. हे थांबण्यासाठी सर्वांनी संघटित व्हायला हवे.
पालघर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
पालघर : येथे १ मार्चला येथील हुतात्मा स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूकमोर्चा काढला. या हत्यांमागील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्र्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हत्यांमागील दोषींना कठोर शासन झाल्याविना अशा प्रकारच्या घटना थांबणार नाहीत, असे विचार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या वेळी संघाचे सर्वश्री जयवंत दांडेकर, राजकुमार नागशेठ, गोपीनाथ आंभिरे, महेंद्र काळे, विनोद वाजपेयी, पाध्ये सर, तेज ठाकूर, सुरजित पाटील, सौ. लक्ष्मी हजारी आणि बजरंग दलचे सर्वश्री मुकेश दुबे, चंदन सिंग इत्यादी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते आणि समविचारी नागरीक उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. मूकमोर्च्याला मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण देण्यात आले होते.
२. मूकमोर्च्यात सहभागी कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून दंडाला काळ्या फीती बांधल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात