इराक आणि सीरियामध्ये इसिसशी लढाई करणाऱ्या सैनिकांना आता नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत आत्मघातकी दहशतवाद्यांबद्दल ऐकलेल्या या सैनिकांना “आत्मघातकी कुत्र्यां”ना तोंड द्यावे लागत आहे.
इराकी सैनिकांच्या विरोधात इसिसने या कुत्र्यांचा वापर करत आहे. “हश्दुश्शाबी” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इराकी सेनेने एक व्हिडियो प्रस्तुत केला आहे. त्यात म्हटले आहे, की इराकमध्ये इसिसचे दहशतवादी कुत्र्यांवर बॉम्ब बांधून त्यांच्याकडे पाठवत आहेत. दहशतवादी या कुत्र्यांचा वापर कसे करतात, हे हश्दुश्शाबी सैन्याचे सैनिक सांगताना या व्हिडियोत दिसून येतात.
यापूर्वी इसिसच्या दहशतवाद्यांनी इराकमधील फलूजा शहरातील लढाईच्या वेळेस इराकी सैन्याविरोधात कोंबड्यांचा वापर केला होता.
इराकी सैन्याचे अधिकारी फहमी अब्बास यांनीही म्हटले आहे, की इसिसच्या दहशतवाद्यांनी ६०० कुत्र्यांवर बॉम्ब बांधून त्यांना लढाईसाठी तयार केले आहे.
इराकमधील मोसिल शहराच्या बहुतांश भागांवर इराक़ी सैन्याने ताबा मिळवला असून इसिस सातत्याने पराभूत होत आहे.
संदर्भ : माझा पेपर