Menu Close

पाक हिंदु क्रिकेटपटू कनेरिया म्हणाला, मी मरतोय, BCCI ने मदत करावी

kaneria_1453381912_145338

नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची शिक्षा झालेला पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ICC समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी मदत करण्याची विनंती BCCI ला केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार तो म्हणाला की, वाचवलेले जे पैसे शिल्लक आहेत त्यावर सध्या उदरनिर्वाह सुरू आहे. पण तेही संपत आले आहेत, त्यामुळे आता फक्त BCCI मला वाचवू शकते.

आणखी काय म्हणाला…

– फिरकी गोलंदाज कनेरिया म्हणाला की, आता माझे सेव्हींगही संपत आले आहे. यावर मी किती दिवस जगू शकेन हे मला माहिती नाही.
– मी तरुण भारतीय गोलंदाजांना स्पिन बॉलिंग शिकवू शकतो. ते मला का बोलावत नाहीत.
– मी पाकिस्तानातील हिंदु आहे. याठिकाणी हिंदु अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे माझे हे हाल आहेत, असे कनेरिया म्हणाला. पीसीबी आपले म्हणणे ऐकत नसल्याचेही कनेरियाने सांगितले.
– मी जेव्हाही आयसीसीला सुनावणीसंदर्भात बोललो तेव्हा माझी विनंती फेटाळण्यात आली.
– इंग्लिश क्रिकेट बोर्डाने माझ्यावर चुकीचा आरोप केला आहे. मी त्यात सहभागी नाही.

मोहम्म्द आमीरशी तुलना

– कनेरियाने ५ वर्षांपासून बॅन असलेल्या मोहम्मद आमीरशी तुलना केली. पीसीबीने स्वतः आमीरच्या प्रकरणात लक्ष घातले असून, माझ्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करत असल्याचे कनेरिया म्हणाला.
– पण माझा विचार कोण करणार, माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय होईल, असे तो म्हणाला.
– बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकून यांनी बॅनबाबत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी चर्चा करून माझी मदत करावी अशी विनंती त्याने केली.
संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *