तिरुअनंतपूरम : केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टीमधील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर कोझीकोड येथे पुन्हा एकदा हल्ला झाला आहे हा हल्ला कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय आहे. हल्ल्यात चार स्वयंसेवक आणि एक भाजप कार्यकर्ता जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये तणावाची स्थिती आहे. संघाच्या कार्यलयावर बॉम्बहल्ला करण्यात आला होता. यामध्ये तीन स्वयंसेवक जखमी झाले होते.
यानंतर सीपीआयएमच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला कुणी घडवून आणला त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.
संदर्भ : लोकसत्ता