हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कारवाई न करणार्या पोलिसांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन
हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांना कधी अटक न करणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांना खोट्या प्रकरणांमध्ये गोवून त्यांना तात्काळ अटक करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुदरंगडी (कर्नाटक) : येथील धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते; मात्र तरीही त्यांना अटक न करणार्या पोलिसांच्या विरोधात हिंदुत्ननिष्ठांनी आंदोलन केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी सुन्नी जामिया मशिदीवर कथित दगडफेक करून हानी पोचवली, असा आरोप करून हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या १६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. (हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणार्या निरपराध हिंदूंवर तात्काळ कारवाई करणारे पोलीस हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण
पडुबिद्रीहून शिर्वाद येथे तांदळाची पोती घेऊन जाणार्या लॉरीचे चालक भास्कर आणि शंकर यांच्यावर मुदरंगडी येथील आरिस आणि सलमान यांनी त्यांच्या दोघा साथीदारांसह आक्रमण केले. या धर्मांधांना पोलिसांनी अटक केली नाही म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पडुबिद्रीच्या पोलीस ठाण्यासमोर २५ फेब्रुवारीला रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले. पोलिसांनी आरोपींना दिवस उजाडण्यापूर्वी अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक विखुरले; मात्र २६ फेब्रुवारीला पोलिसांनी कोणालाही अटक न केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी महामार्गावर रस्ताबंद आंदोलन केले. (हिंदुत्वनिष्ठांना खोटे आश्वासन देऊन फसवणारे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर पडुबिद्री ठाण्याच्या समोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना सुन्नी जामिया मशिदीवर दगडफेक केल्याच्या आरोपावरून अटक केली. मुदरंगडीच्या घटनेच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांना अटक करून संघटनेला दुर्बल करण्यासाठी काँग्रेस सरकार प्रयत्न करत आहे, असा आरोप कापुक्षेत्राचे भाजपचे अध्यक्ष प्रकाश शेट्टी यांनी केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात