पाकमधील जिहादी आतंकवादामुळे पाकमधीलच नव्हे, तर जगभरातील लोक उद्ध्वस्त होत आहेत, याविषयी राबी पीरजादा का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लाहोर : बॉलिवूडच्या (हिंदी चित्रपटसृष्टीच्या) विशेषत: सलमान खान यांच्या चित्रपटांमुळे पाकिस्तानी तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. हे चित्रपट बघून पाकिस्तानी तरुण आपली संस्कृती, परंपरा विसरत आहेत, अशी टीका पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका राबी पीरजादा यांनी केली आहे. (स्वतःची संस्कृती आणि परंपरा यांविषयी अशी जागरूकता भारतातील किती अभिनेते आणि अभिनेत्री दाखवतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) लाहोरमधील एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यापूर्वी पाकिस्तानी अभिनेता सबा कमार यांनीही अशा प्रकारची टीका केली होती.
राबी पुढे म्हणाल्या की, बॉलिवूडच्या बहुतांश चित्रपटांत गुन्हेगारी हाच केंद्रबिंदू असतो. सलमान खान यांचे चित्रपट तर गुन्हेगारीला उघड प्रोत्साहनच देतात. (भारतीय चित्रपटांचे हे खरे स्वरूप असले, तरी पाकमध्ये प्रत्यक्ष होत असलेली गुन्हेगारी आणि जिहादी आतंकवाद पहाता ती अत्यंत नगण्यच गोष्ट म्हणावी लागेल ! याविषयी राबी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाकिस्तानी चित्रपटांच्या सुवर्णकाळात सामाजिक शिक्षण देणारे चित्रपट बनवले जायचे. चित्रपटांतून नैतिकता जपण्याचा संदेश दिला जायचा; मात्र बॉलिवूडच्या चित्रपटांनी ते सगळे पालटून टाकले आहे. (जर पाकच्या चित्रपटांतून खरीच नैतिकता शिकवण्यात आली असती, तर आज पाक आतंकवादी देश झाला नसता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात