हिंदु संघटनांकडून रासुका लावण्याची मागणी
भगवान शिवाचा अवमान रोखण्यासाठी संघटित झालेल्या धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इंदूर (मध्यप्रदेश) : येथील खजराना क्षेत्रातून प्रसिद्ध होणार्या खजराना लाइव या वृत्तपत्रात भगवान शिव आणि पार्वतीदेवी यांच्याविषयी अत्यंत अश्लील लेख प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी संपादक दीपक असीम यांना ३ मार्च या दिवशी अटक करण्यात आली. पाटीदार समाजाचे सर्वश्री गोविंद, राजेश, सुनील, विपीन, राजकुमार, हिमांशू यांच्यासह अन्य धर्माभिमान्यांनी केलेल्या तक्रारीनंतर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भा.द.वि. कलम २९५ (अ) अनुसार असीम यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्याची बातमी कळताच शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली.
तोंडदेखली क्षमायाचना !
सदर वृत्तपत्रात ओशो भक्त कै. दादा भालचंद्र भट्ट यांनी आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र पंडित जयदेवजी भट्ट यांनी ओशो यांच्या प्रवचनातील अंश प्रसिद्ध करण्यासाठी प्रायोजित केले आहेत. भगवान शिवाच्या अवमानाचे प्रकरण तापल्यावर संपादक असीम यांनी प्रारंभी हे प्रवचन मी ओशोप्रेमींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून घेतले आहे. मी जर ते वाचले असते, तर छापले नसते, अशी सारवासारव करत क्षमायाचना करण्याचे नाटक केले. यात शिवाचा अवमान करण्यात आला आहे. आरोपी पत्रकाराने यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. सदर पत्रकार मूळ हिंदु असून त्याने मुसलमान मुलीशी विवाह करून धर्मपरिवर्तन केले आहे.
विविध हिंदु संघटनांकडून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी !
या प्रकरणानंतर अखिल भारतीय हिंदु महासभा, हिंदु गोरक्षा वाहिनी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरीक्षक हरिनारायण चारी मिश्रा यांची भेट घेऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची आणि या वृत्तपत्रावर बंदी आणण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात अखिल भारतीय हिंदु महासभेचे प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्रसिंह ठाकूर, श्री. अखिलेश चौधरी, श्री. अनिल पांडे, श्री. सुरेश पाठक, श्री. राजा राजपूत, श्री. नरेश जोशी, श्री. अवध साहू, अर्जुन पवार, विनोद मिश्रा, राहुल गौड, श्री. विनोद शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात हिंदु जागरण मंचाच्या शिष्टमंडळानेही पोलीस उपमहानिरीक्षकांची भेट घेऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात