-
हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्याचा परिणाम !
-
भारतातील मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना याविषयी आवाज उठवणार का ?
न्यूयॉर्क : १२ मार्च या दिवशी अमेरिकेतील प्रख्यात वृत्तवाहिनी सीएन्एन् वर ‘बिलीव्हर विथ रेझा अस्लन’ नावाचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रसंचालक धर्मांध रेझा अस्लन आहे. या वेळी हा कार्यक्रम हिंदु धर्मावर आधारित आहे. कार्यक्रम प्रसारित होण्याआधी सीएन्एन् वृत्तवाहिनीवर त्यातील काही भाग प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात हिंदु धर्मियांना नरभक्षक (कॅनिबॉल) दाखवण्यात आले आहे, असे दिसून आले. त्यावरून ‘उर्वरित कार्यक्रमात हिंदु धर्माचे किती विकृत स्वरूप प्रसारित केले जाईल’, याची कल्पनाही करवत नाही. हा कार्यक्रम सीएन्एन् वृत्तवाहिनीवरून प्रसारित करू नये, यासाठी वृत्तवाहिनीला आग्रह म्हणून हिंदु महासभा, अमेरिका या संघटनेच्या वतीने ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम प्रारंभ करण्यात आली आहे. (हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात कृतीशील होणार्या् हिंदु महासभा, अमेरिका संघटनेचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या मोहिमेच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे, ‘हिंदु धर्म हा पाश्चिमात्य देशात धर्माची जी व्याख्या प्रचलित आहे, त्यात बसत नाही. हिंदु धर्मातील अध्यात्म हे सर्वव्यापी असून त्यातून स्थूल आणि सूक्ष्म जगाचे ज्ञान उपलब्ध आहे. हिंदु धर्म पाळणाऱ्यांना साधनेचे संपूर्ण स्वातंत्र्य असून केवळ एका धर्मग्रंथात सांगितले, तेवढेच पाळायची सक्ती नाही. धर्माला कुठलाही कायदा, आदेश (कमांडमेंट), फतवा लागू नाही. ज्या देशात रहातो, त्याच देशाचा घटनात्मक कायदा पाळावा लागतो. हिंदु धर्माला धर्मांतर मान्य नाही; कारण त्या अर्थाने तो धर्मच नाही. तरी सीएन्एन् वृत्तवाहिनीने वरील कार्यक्रमातून होणारे हिंदु धर्माचे विडंबन टाळण्यासाठी हा कार्यक्रमच रहित करावा, अशी विनंती करण्यात येत आहे.