केरळमधील स्वयंसेवकांना न्याय मिळण्यासाठी अशी निदर्शने करावी लागतात, हे दुर्दैवी होय ! केंद्र सरकार स्वतःहून याची नोंद घेऊन कृती का करत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोलकाता : केरळ राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते यांच्यावर गेल्या काही वर्षांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणात अनेक जण ठार, तर शेकडो जण गंभीर घायाळ झाले. केरळात माकपचेच सरकार असतांना या हत्यांचे अन्वेषण समाधानकारक होत नाही. त्याच्या निषेधार्थ एकेकाळी कम्युनिस्टांचा गड असलेल्या कोलकात्यात मानवाधिकार रक्षा मंचच्या वतीने ४ मार्चला प्रचंड मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सहस्रो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हा मोर्चा कॉलेज स्क्वेअर ते राणी राशमनी मार्गापर्यंत काढण्यात आला. या मोर्च्याच्या समारोप प्रसंगी अनेक वक्त्यांची भाषणे झाली. गेल्या काही वर्षांत केरळ राज्यात माकप सत्तेवर असतांना २७३ हिंदूंची हत्या करण्यात आली. ‘हे हत्यासत्र त्वरित थांबले नाही, तर त्याची प्रतिकूल प्रतिक्रिया माकपला देशात इतरत्र भोगावी लागेल’, अशी चेतावणी मोर्च्यात देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात