हिंदुंची असुरक्षित मंदिरे
शिर्डी : संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील अकलापूर गावतील एकमुखी दत्त मंदिराचा कळस चोरट्यांनी रात्रीतून लंपास केला आहे. ५१ तोळे वजन असलेला कळसापैकी २१ तोळे सोन्याचा कळसाच्या वरील भाग चोरीला गेला असून, या घटनेनंतर अकलापूर ग्रामस्थांनी निषेध नोंदवत पूर्ण गाव बंद ठेवले होते.
संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील अकलापूर या गावात स्वयंभू असलेले एकमुखी दत्त देवाच मंदिर आहे. राज्यभरातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
२००३ साली ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करीत गावातून सोने गोळा केले आणि ५१ तोळे वजनाचा सोन्याचा कळस मंदिरावर बसवला. यावेळी अनेक महिलांनी आपल्या गळ्यातील मनी मंगळसूत्र कळसासाठी दिले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भिकाजी भैय्या यांनी दिली.
दरम्यान, ६ मार्च च्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कळसावर चढत पूर्ण कळस चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण कळस निघत नसल्याने चोरट्यांनी कळसाचा वरील भाग कापत २० ते २५ तोळे वजनाचा भाग चोरून नेला असल्याची माहिती फिर्यादी आणि ट्रस्टचे उपाध्यक्ष दतात्रय आभाळे यांनी दिली.
संदर्भ : एबीपी माझा