कथित आरोपांच्या साहाय्याने साधू-संतांची अश्लाघ्य मानहानी करणारी माध्यमे धर्मांध तांत्रिकाची साधी बातमीही दाखवत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सूरत (गुजरात) : येथील नानपुरा भागात अकमल रजा या ढोंगी धर्मांध तांत्रिकाने आजारी पतीवर उपचार करण्याचे कारण सांगत महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीचे १ वर्षे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून तांत्रिकाला अटक केली आहे.
पोलिसांच्या सुत्रानुसार एका ३५ वर्षीय महिलेचा पती काही वर्षांपासून आजारी होता. त्यामुळे पतीच्या उपचारासाठी ही महिला अकमलकडे गेली होती. त्यावेळी त्याने पतीच्या उपचारासाठी एक तांत्रिक विधी करावा लागेल, असे सांगितले आणि त्यासाठी एकटे बोलावले. या विधीकरता महिला एकटी गेली. त्यानंतर त्याने महिलेला विधीच्या बहाण्याने तळघरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही महिलेच्या पतीचा आजार बरा झाला नाही. त्यामुळे त्याने तिच्या १४ वर्षीय मुलीलाही विधीसाठी बोलावले आणि तिच्यावरही बलात्कार केला. अनेक दिवसांपासून या तांत्रिकाच्या वासनेला बळी पडलेल्या या मुलीने याविषयी तिच्या शिक्षकांना माहिती दिली. त्यानंतर एका नगरसेवकाच्या साहाय्याने पोलीसात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात