नंदुरबार : होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या नावाखाली अनुचित प्रकार करणार्यांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले. हिंदु जनजागृती समितीने नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना नुकतेच निवेदन दिले. या वेळी समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. रजनी नटावदकर, भावना कदम, जितेंद्र राजपूत, मयुर चौधरी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाची नोंद घेत सांगितले की, पोलिसांच्या साहाय्याने अनुचित प्रकार रोखले जातील.
निवेदन देण्यासाठी समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि भेटण्याविषयीची चिठ्ठी आत पाठवून दालनाबाहेर उभे राहिले. त्या वेळी भेटण्यासाठी आलेल्या इतरांनाही दालनाबाहेर थांबवण्यात आले होते; परंतु समितीची चिठ्ठी पहाताच जिल्हाधिकारी स्वतः उठून बाहेर आले आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन आदराने स्वीकारले. (हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची तत्परतेने नोंद घेणार्या जिल्हाधिकार्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात