- भारताला इसिसचा धोका नाही, असे म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
- महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मारले छापे !
- देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा इसिसचा कट अन्वेषण यंत्रणांनी उधळला !
मुंबई : देशभरात एकाच वेळी बॉम्बस्फोटांची शृंखला घडवण्याचा कट राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) अधिकार्यांनी उधळला. यांसदर्भात मुंब्रा (महाराष्ट्र), हैद्राबाद, राजस्थान आणि कर्नाटक येथून ११ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पकडण्यास आलेल्या सर्व जणांचा इसिसशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
देशातील सार्वजनिक ठिकाणांवर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी या सर्वांनी स्वत: अत्याधुनिक स्फोटके निर्माण करण्याचे नियोजन केले होते. हैद्राबाद येथील त्रिलोकचौकी येथून नफीझ यांच्याकडून विस्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. फराहतुल्ला घोरी या अटक केलेल्या आतंकवाद्याचा या कटात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. कर्नाटक राज्यातील तुमकुरू येथून सय्यद मुजाहिद हुसेन (वय ३३ वर्षे) आणि मंगळुरू येथील नजमुल हुडा (वय २५ वर्षे) या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. नजमुल हुडा हा एका मौलवीचा मुलगा आहे. नजमुल जुनूद-अल-खलीफा-ए-हिंद या इसिसशी संबंध असलेल्या संघटनेच्या संपर्कात होता. सय्यद हुसेन हा एका तहसीलदाराचा मुलगा आहे. अन्य आतंकवाद्यांची नावे चौकशी यंत्रणांनी उघड केलेली नाहीत.
ठाणे : २२ जानेवारी या दिवशी सकाळी आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या संयुक्त कारवाईत ठाण्याजवळील मुंब्रा येथून इसिसच्या एका संशयित आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहेे. प्रजासत्ताकदिनी देहली-एन्सीआर्मधील प्रसिद्ध मॉलवर आणि हरिद्वारमधील अर्धकुंभपर्वात आक्रमणे घडवून आणण्याचा कट आखणार्या इसिसच्या चार आतंकवाद्यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. (यावरून इसिसच्या आतंकवाद्यांनी भारतात आक्रमणे करण्यास आरंभ केला आहे, हे सिद्ध होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या आतंकवाद्याकडून बॉम्बचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात