Menu Close

‘इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट’च्या (IAIS च्या) राष्ट्रव्यापी चळवळीला अनेक राज्यांतून मोठा प्रतिसाद

इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट (आय.ए.आय.एस्.) भारतमातेसाठी बलीदान करण्याची क्षमता असणार्‍या युवकांच्या शोधात ! – पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट डॉट कॉम

IAIS

मुंबई : आज इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचे हस्तक आणि समर्थक गावागावांत सापडत आहेत. काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकावणारे, राजस्थानात इसिस जिंदाबादच्या घोषणा देणारे, तमिळनाडूत इसिसचे टी-शर्ट घालणारे किंवा आज ठाणे, हैद्राबाद आणि कर्नाटक येथे अटक करण्यात आलेले इसिसचे समर्थक म्हणजे भारतात इसिस पसरत असल्याचा ठळक पुरावा आहेत. भारत शासनाने इसिसवर बंदी घालून इसिसविरोधी वैश्‍विक लढ्यात भारत सहभागी असेल, असे घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतातील इसिसच्या कारवायांना रोखणे, हे जसे शासनाचे काम आहे, तसेच ते एक उत्तरदायी नागरिक म्हणून भारतियांचेही कर्तव्य आहे. भविष्यात प्रत्येक रस्त्यावर लढण्याची सिद्धता करणार्‍या इसिसवाद्यांना प्रत्येक रस्त्यावर रोखण्यासाठी आणि भारतमातेच्या रक्षणासाठी बलीदान करण्याची क्षमता असणार्‍या युवकांच्या शोधार्थ आम्ही इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट ही चळवळ चालू केली आहे. इसिसच्या आतंकवाद्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित ज्वलज्जहाल आणि प्रशिक्षित युवकांची आवश्यकता आहे. यासाठीच आम्ही इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटच्या (आय.ए.आय.एस्.च्या) वतीने जाहीर आवाहन करत आहोत की, भारतमातेच्या रक्षणार्थ बाहुबलाद्वारे संघर्ष करण्याची आणि बलीदानाची सिद्धता असलेल्या देशभक्त युवकांनी आम्हाला संपर्क साधावा. अशांसाठी लवकरच आतंकवादविरोधी प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात येणार आहे, असे आवाहन Indiaagainstislamicstate.com या संकेतस्थळाचे संपादक श्री. पारस राजपूत यांनी केले आहे.

राजपूत पुढे म्हणतात, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटने चालू केलेल्या Indiaagainstislamicstate.com या संकेतस्थळावरील आवाहनाला देशप्रेमी तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. अनेक तरुण या राष्ट्ररक्षणाच्या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि आसाम या राज्यांतून जोडल्या गेलेल्या युवकांना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणाच्या अंतर्गत बाँबस्फोट किंवा युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना कसे आपत्कालीन साहाय्य करावे, जखमी नागरिकांवर प्रथमोपचार कसे करावेत, आदींचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येईल. त्यामुळे राष्ट्ररक्षणार्थ ज्या तरुणांना काही करायचे आहे, त्यांनी Indiaagainstislamicstate.com वेबसाईटला भेट द्यावी आणि या आतंकवादविरोधी लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात येत आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *