महिला दिनानिमित्त रणरागिणी शाखेच्या वतीने मार्गदर्शन
खंडाळा (जि. सातारा) : आजची स्त्री उच्चशिक्षित आणि आधुनिक होत आहे; मात्र महिलांची सुरक्षा आणि सन्मान यांचा प्रश्न भेडसावतच आहे. महिलांनी आधुनिकता आणि स्वैराचार यातील भेद लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. साधना करून महिलांनी आत्मबल वाढवावे आणि स्वरक्षणासाठी सक्षम व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. धनश्री शिंदे यांनी केले. बकाजीराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत यादव यांनी जागतिक महिला दिनानिमित्त श्री. चौणेश्वर मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी बावडा गटातील जिल्हा परिषद सद्स्या सौ. दिपाली साळुंखे, बावडा गणातील पंचायत समिती सदस्या सौ. अश्विनी पवार, पारगावच्या सरपंच सौ. मंगल गायकवाड, तसेच गावातील बचत गटाच्या अध्यक्षा, तसेच समितीच्या सौ. गौरी बोराटे यांसह ९५ महिला उपस्थित होत्या. सौ. शिंदे यांनी धर्माचरणाच्या कृतींविषयीही मार्गदर्शन केले.
वैशिट्यपूर्ण
१. श्री. चंद्रकांत यादव यांनी सनातन-निर्मित ग्रंथांचा एक संच वाचनालयासाठी घेतला.
२. सौ. शिंदे यांच्या मार्गदर्शनानंतर स्थानिक महिलांनी गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची उत्स्फूर्तपणे मागणी केली.
३. सनातन प्रभातच्या वाचक सौ. गीता शिंदे आणि कु. शिवानी शिंदे याही सेवेत सहभागी झाल्या होत्या. (सौ. गीता शिंदे आणि कु. शिवानी यांचे अभिनंदन ! असे कृतीशील वाचक सर्वत्र हवेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात