जयपूर अन्य विश्वविद्यालयांनी देखील राजस्थान विश्वविद्यालयाचा आदर्श घ्यावा ! – संपादक, हिंदुजागृति
राजस्थान विद्यापीठाने कॉमर्स शाखेतील बँकींग आणि फायनान्स हे दोन्ही विषय अभ्यासक्रमातून काढून टाकले आहेत. या दोन्ही विषयांऐवजी आता राजस्थान विद्यापीठात गीता आणि वेद शिकविले जाणार आहेत. त्याशिवाय भगवान कृष्ण, महावीर, महात्मा गांधी, गीताचे प्राथमिकता आणि योगा आदी विषयांचे ज्ञान दिले जाणार आहेत.
कॉमर्स कॉलेजचे माजी प्राचार्य आणि अभ्यासक्रम पुनर्विलोकन समितीचे माजी अध्यक्ष नवीन माथूर म्हणाले की, भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय महाकाव्य, धार्मिक व्यक्ति आणि भारतीय दर्शन शास्त्र माहित व्हावं हा या निर्णयामागचा हेतू आहे. विद्यार्थ्यांना ही माहिती देऊन जगाला मॅनेजमेंटची नवी ओळख करून देणे ही त्यामागची भूमिका आहे.
विद्यापीठात वेद आणि गीता शिकविण्यासाठी संघटनात्मक सिद्धांत आणि स्वभाव या विषयातील तज्ज्ञ रॉबर्ट ओव्हेन, जेम्स बर्नहॅम आणि मेरी पार्कर फोलेट आदी परदेशी लेखकांचे धडे अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत. तसेच अभ्यासक्रमातून पब्लिक अँड बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनलाही अभ्यासक्रमातून हटविण्यात आले आहे. त्याऐवजी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधींचे दर्शन शास्त्र, रामायण व गीतेचा समावेश करण्यात आला आहे.
जगातील मॅनेजमेंटचे बहुतेक सिद्धांत भारतीय पुराणातूनच घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिद्धांत ५ हजार वर्ष जुने आहेत, असा दावा माथूर यांनी केला. तर उच्च शिक्षणाचं भारतीयकरण करण्यासाठीच अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याचं कॉमर्स विभागाचं म्हणणं आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स