पालक संघटनांनी न्यायालयाचे द्वार ठोठावले
अमेरिकेतील अभ्यासक्रमात अशा प्रकारे हिंदु धर्माची अपकीर्ती होत असतांना भारत सरकार त्याला विरोध करणार का ? – संपादक, हिंदुजागृती
फ्रेमोंट (अमेरिका) – शिक्षणात समान वागणूक देण्यासाठी स्थापन केलेल्या कॅलीफोर्निया पालक संघटनेने शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची माहिती देण्यात भेदभाव करण्यात आला असल्याचे सांगत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. (धर्माविषयी जागृत असणार्या कॅलीफोर्नियामधील हिंदु धर्मियांच्या पालक संघटनेचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
शिक्षण विभागाचे भारतविरोधी आणि हिंदुविरोधी धोरण
या याचिकेत शाळांच्या अभ्यासक्रमात ख्रिस्ती, ज्यू, इस्लाम, बौद्ध इत्यादी धर्मांविषयी अनेक सकारात्मक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे; मात्र तशी वागणूक हिंदु धर्माला देण्यात आली नाही, असे म्हटले आहे. या याचिकेत शिक्षण विभाग शैक्षणिक मंडळ इत्यादींना प्रतिवादी करण्यात आले आहे. या आधी याच अभ्यासक्रमात भारताचे नाव वगळून ‘दक्षिण आशिया’ हे नाव प्रचलित करण्यात आले होते; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याविरुद्ध लढा देऊन भारताच्या नावाचा अंतर्भाव करण्यास शिक्षण मंडळास भाग पडले होते. तरीही शिक्षण अभ्यासक्रमात अनेक गोष्टींत सुधारणा आवश्यक आहेत.
हिंदु धर्माविषयी नकारात्मक माहिती
अभ्यासक्रमात हिंदु धर्माचा उल्लेख करतांना त्यातील जातीव्यवस्थेवर अधिक भर देण्यात आला आहे. (हिंदु धर्मात जातीव्यवस्था नसून वर्णाश्रमव्यवस्था आहे आणि त्यामुळे समाजव्यवस्था उत्तम राखता येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) इतर धर्माविषयी मात्र अशा नकारात्मक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला नाही. (हिंदु धर्माची हेतूपुरस्सर अपकीर्ती करून अमेरिकेतील भावी पिढीच्या मनात हिंदु धर्माविषयी नकारात्मक मत बनवण्याचे हे षड्यंत्र आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)