Menu Close

वनवास संपला, आता भाजपकडून राममंदिर बनवण्याची अपेक्षा ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

उत्तरप्रदेशातील भाजपच्या यशाविषयी नेत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई : उत्तरप्रदेशमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी याविषयी भाजपचे अभिनंदन केले आहे. ‘भाजपने आता लवकरच राममंदिर बनवावे’, अशी अपेक्षा त्यांनी भाजपकडून व्यक्त केली आहे. श्री. राऊत पुढे म्हणाले, ‘‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे लोकशाहीच्या प्रक्रियेतून आले आहेत. भाजपला मिळालेल्या यशाचे आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे आम्ही अभिनंदन करतो. लोकांना जिथे पर्याय दिसला, तिथे सत्ताधार्‍यांच्या विरोधात मतदान केले. उत्तरप्रदेशातील राजकारण पालटत आहे. विजय हा विजय असतो.’’

राममंदिर बनवण्याचा अजेंडा भाजप पूर्ण करणारच ! – विनोद तावडे, शिक्षणमंत्री

राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांतील भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपच्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी भाजपच्या यशाविषयी आनंद व्यक्त केला आहे. ५ राज्यांतील जनतेने पारदर्शक कारभारावर ठेवलेला हा सर्वांत मोठा विश्‍वास आहे. भाजप राममंदिराचा अजेंडा पूर्ण करणारच आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *