हिंदुद्वेषी ‘सीएन्एन्’ वाहिनीकडून हिंदु धर्माच्या विरोधात खोटे वार्तांकन
हिंदु धर्मविषयक खोटे वार्तांकन करणार्या वाहिनीच्या विरोधात परदेशातील एक महिला खासदार आवाज उठवते; मात्र भारतातील एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी सीएन्एन् ने हिंदु धर्माविषयी सादर केलेल्या एका कार्यक्रमातून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अमेरिकेतील हवाई येथील डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी सीएन्एन्ला फटकारले आहे. त्यांनी सीएन्एन् ने चुकीचे वार्तांकन केल्याचे म्हटले आहे.
सीएन्एन् ने त्याच्या ‘बिलीव्हर’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात हिंदु धर्मातील तांत्रिकांच्या श्रद्धा आणि परंपरा यांना चुकीच्या पद्धतीने दाखवले होते. यावर तुलसी गबार्ड यांनी त्यांच्या फेसबूक पानावर लिहिले, ‘कार्यक्रमाचे निवेदक असलान आणि सीएन्एन् यांनी चक्रावून टाकणार्या दृश्यांच्या माध्यमातूंन तपस्वींच्या एका पंथाला वाईट पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे केवळ अज्ञानच वाढणार आहे. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात