एक आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी हिंदु धर्मावर आघात करत असतांना भारतातील मोठ्या संघटना गप्प का ? भारत सरकारनेही यात हस्तक्षेप करावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : अमेरिकेतील सीएन्एन् या वृत्तवाहिनीने ‘बिलिव्हर विथ रझा अस्लान’ या कार्यक्रमाचे सहा भाग प्रसारित केले आहेत. या कार्यक्रमातून हिंदु धर्माचा अवमान करण्यात आला आहे. ‘सीएन्एन्ने इतर देशांचा द्वेष करणे आणि हिंदूद्वेषी कार्यक्रम थांबवावेत आणि त्वरित क्षमा मागावी’, अशी मागणी अमेरिकेतील ‘अमेरिकन हिंदूज अगेन्स्ट डिफेमेशन’ (आहाद) या संघटनेकडून करण्यात आली आहे. (अमेरिकेतील हिंदूंच्या संघटना हिंदु धर्मविरोधी कार्यक्रमांचा विरोध करतात; मात्र भारतातील हिंदूंच्या संघटना निष्क्रीय रहातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या संघटनेच्या नावाखाली अमेरिकेतील १६ हिंदू संघटना एकत्र आल्या आहेत. त्यात ‘हिंदू मंदिर एक्झिक्युटिव्ह कौन्सिल’चाही समावेश आहे. ही संघटना अमेरिकेतील १५० मंदिरांचे प्रतिनिधित्व करते. ११ मार्च या दिवशी या कार्यक्रमाच्या विरोधात अमेरिकेत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. या संघटनेने सीएन्एन् आणि रझा अस्लान यांच्याविरोधात निदर्शने केली. ‘संस्कृत भारती’नेही निदर्शनांत भाग घेतला.
या विरोधावर रझा अस्लान यांनी फेसबूक पोस्टद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, ‘माझा कार्यक्रम हिंदु धर्माविरुद्ध नाही, तर त्यातील अघोरी पंथाविरुद्ध आहे. हा पंथ अघोरी कृत्यांसाठी प्रसिद्ध आहे.’ (हिंदूंच्या धर्मातील अघोरी पंथाविषयी बोलण्याचा अधिकार रझा अस्लान यांना कोणी दिला ? रझा अस्लान यांनी हिंदु धर्माच्या संदर्भातील कार्यक्रम सादर करण्याऐवजी त्यांच्या धर्मातील बुरसटलेल्या प्रथांविषयी आणि जिहादी आतंकवादाविषयी कार्यक्रम सादर करावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात