यवतमाळ: येथील रणरागिणी शाखेच्या वतीने भारी येथे महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले. या वेळी रणरागिणीच्या कु. माधवी चोरे म्हणाल्या, ‘‘पाश्चात्त्यांचेे अंधानुकरण टाळून धर्माचरण कराल, तरच राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांसारख्या थोर स्त्रियांंचे काही गुण आपल्यात येतील. आज सर्वजण दूरचित्रवाहिनी पाहून पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत आहेत. यामुळे महिलांवर अन्याय होत असून छेडछाड, लैंगिक शोषण, बलात्कार या समस्यांनी त्या ग्रासल्या आहेत. शासन यावर आळा घालण्यात अपयशी ठरलेले आहे. अशा वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, साधना करणे, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्माचरणाने आत्मबळ निर्माण होऊन, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन संघटित प्रयत्न केल्यास आज महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.’’ या वेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे अनेक प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात