Menu Close

शिवजयंतीनिमित्त भगवा ध्वज लावणार्‍या धर्माभिमान्यांवर समाजकंटकांकडून दगडफेक

नंदुरबारच्या राणी लक्ष्मीबाई चौकातील घटना

शिवजयंतीनिमित्त भगवा ध्वज लावतांना दगडफेक व्हायला, हे पाकिस्तान आहे का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नंदुरबार : शिवजयंतीनिमित्त सुशोभीकरण करण्यासाठी तरुण भगवा ध्वज लावत असतांना त्यांच्यावर १३ मार्चला मध्यरात्री येथील राणी लक्ष्मीबाई चौकाजवळ समाजकंटकांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनासुद्धा दगड लागले; परंतु तरीही सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.

१. हिंदु जनजागृती समिती, विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोरक्षा समितीसह सर्व हिंदुप्रेमी संघटना, तसेच भाजप, शिवसेना यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वच स्तरांतील शिवप्रेमी अन् धर्माभिमानी मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

२. १३ मार्चच्या रात्री अचानक दगडफेक चालू झाल्याने काही काळ तणाव निर्माण होऊन धावपळ झाली.

३. त्याच ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या तंबूवर दगड येऊन पडले आणि काही पोलीस कर्मचार्‍यांनाही दगड लागले, असे तेथील तरुणांचे म्हणणे आहे. (पोलिसांवरच दगडफेक होत असेल, तर ते जनतेचे रक्षण कसे करतील ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही घटना नंदुरबार शहर पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आणि इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी आले अन् बंदोबस्त वाढवून स्थिती नियंत्रणात आणली.

४. १४ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता विविध पक्ष, संघटना यांच्या पदाधिकार्‍यांनी शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर जातीय तणाव निर्माण करू पहाणार्‍या समाजकंटकांवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली. लेखी तक्रार देऊनही गुन्हा नोंद झाला नव्हता.

५. ही घटना घडली, त्याच ठिकाणी ‘टिपू सुलतान चौक’ नावाचा वादग्रस्त फलक आहे. त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड येऊन पडलेले पोलिसांना आढळून आले. विशेष असे की, या फलकाच्या खाली मोठ्या संख्येने दगड, गोटे, विटा यांच्या तुकड्यांचे ढीग लावलेले आहेत. ही दंगलीची पूर्वसिद्धता आहे का, असा प्रश्‍न या भागातील रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *