Menu Close

बलात्कार करणार्‍याला देहदंड देण्याचा अधिकार माता-भगिनींना द्या ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त आयोजित केलेले व्याख्यान

सातारा : मोघल राज्यकर्त्यांच्या काळाप्रमाणेच सध्याची परिस्थिती आहे. राजरोसपणे बलात्कार होत असून ते राज्यकर्त्यांना दिसत नाहीत. बलात्कार करणार्‍याला १२ घंट्यांच्या आत देहदंड देण्याचा अधिकार माता-भगिनींना देण्यात यावा, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी सातारा जिल्ह्यातील ७०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंची निद्रा ही धोक्याची घंटा ठरू शकते. येणारा काळ महाभयानक असून साधू-संतांनीही याविषयी भाष्य केले आहे. शिवछत्रपती पिता-पुत्रांचे या संकटांना तोंड देण्यासाठी आयुष्य गेले. एक मास अत्यंत हालहाल करून छत्रपती संभाजी महाराज यांना ठार मारण्यात आले; मात्र आजचे हिंदू हे विसरले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलीदान दिले नसते, तर आज आपण हिंदू राहिलो नसतो. यानिमित्ताने आपण शपथ घेऊ की, शिवछत्रपती पिता-पुत्रांप्रमाणे आपणही सदैव भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे.’’ भविष्यात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राष्ट्रासाठी आवश्यक कृतीशील कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये गोहत्या करणार्‍यास देहदंड देणे, महाराष्ट्रातील माता-भगिनींना संघटितकरून मद्यबंदीसाठी मंत्रालयावर मोर्चा नेणे, शिवछत्रपतींचे ३२ मण सोन्याचे सिंहासन श्री रायगडावर पुन्हा स्थापित करणे या गोष्टी अंतर्भूत आहेत.

क्षणचित्र : या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो धारकर्‍यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *