तुळजापूर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी अशी मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करावीत !- संपादक, दैनिक सनातन प्रभात
धाराशिव : तुळजापूर शहर राज्य सरकारने ‘मद्यमुक्त’ म्हणून घोषित करावे आणि त्याद्वारे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखावे, अशा आशयाचे निवेदन श्री तुळजापूर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, उपनगराध्यक्ष तुळशीदास साखरे यांसह अन्य देवीभक्त यांनी जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेे आहे. येथील तुळजापूर नगरपालिकेनेही येथील जनतेच्या भावना लक्षात घेऊन वरील मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की…
१. तुळजापूर तीर्थक्षेत्राला प्रतिदिन सहस्रो भाविक भेट देतात; परंतु मद्याच्या व्यसनामुळे भाविक आणि स्थानिक नागरिक यांच्यातही व्यसनाधीनता वाढत आहे. यातूनच अपप्रकार आणि अवैध धंदे वाढत आहेत.
२. परिणामी श्री तुळजाभवानीदेवीच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या या तीर्थक्षेत्राला गालबोट लागण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
३. तुळजापूर नगरपालिकेनेही यापूर्वी मद्यबंदीचा ठराव सर्वानमुते संमत केेला होता; परंतु त्याची कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे शासनस्तरावरून मद्यबंदीचे आदेश देण्यात यावेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात