सातारा : रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. या वेळी ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दत्ता सणस, श्री. उमेश गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्री. वैभव क्षीरसागर उपस्थित होते.
निवेदनानंतर दिलेल्या प्रतिक्रिया
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला नेहमीच सहकार्य – संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक
रंगपंचमीनिमित्त घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी समिती करत असलेले कार्य चांगले आहे. आम्हीही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. समितीच्या कार्याला पोलिसांचे नेहमीच सहकार्य असेल ! पोलीस अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या असून गैरप्रकार आढळल्यास आम्हाला कळवू शकता.
शहर पोलीस आणि समिती यांच्या समन्वयाने गस्त पथक नेमणार – बी.आर्. पाटील, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे
गैरप्रकार रोखण्यासाठी समितीचे पहारा देण्याचे नियोजन कौतुकास्पद आहे. या मोहिमेमध्ये शहर पोलिसांचेही कृतीशील सहकार्य समितीच्या कार्याला असेल. शहर पोलीस आणि समिती यांच्या समन्वयाने गस्त पथक नेमून गैरप्रकार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
समितीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. मीही गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेला तातडीने आदेश देतो. – निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारत वाघमारे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात