कवठेमहांकाळ : रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. शिवानंद पोतदार, हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रसाद कमलाकर, श्री. महादेव भोसले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अण्णासाहेब जाधव, संतोष चव्हाण उपस्थित होते. श्री. क्षीरसागर यांनी समितीचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात