इस्लाममध्ये तलवारीच्या बळावरच धर्मांतर झाल्याचा इतिहास असतांना पाकच्या पंतप्रधानांचे फुकाचे बोल !
इस्लामाबाद : इस्लाममध्ये प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देण्यात आले आहे. मग तो कोणत्याही जातीचा वा संप्रदायाचा किंवा कोणत्याही धर्माचा असो. म्हणूनच कोणाचेही बळजोरीने धर्मांतर करणे हा गुन्हा आहे, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे हे मी माझेे कर्तव्य समजतो, असे विधान पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना केले. (पाकमध्ये फाळणीनंतर हिंदूंची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात का घटली ? शरीफ यांच्या या वक्तव्यास हिंदू भूलणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
नवाज शरीफ पुढे म्हणाले की,
१. पाकमध्ये धर्माविषयी कोणताही संघर्ष नाही. जर संघर्ष असेलच, तर तो आतंकवादी आणि धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल करणार्या, तसेच निरपराध लोकांना मारणार्या लोकांमध्ये आणि देशाची प्रगती करू पाहणार्या नागरिक यांच्यामध्येच आहे.
२. काही लोकांनी धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र पाकिस्तानात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मूभा आहे. (या वक्तव्यावर कोण विश्वास ठेवील ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. पाकिस्तान हा देश कोणत्या धर्माच्या विरोधात आहे म्हणून निर्माण झालेला देश नाही. (पाकची निर्मितीच हिंदूंवरील आत्यंतिक द्वेषापोटी आणि मुसलमानांना स्वतंत्र भूमी मिळावी, यासाठी झाली आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पाकिस्तानात एखाद्या धर्माला न्यून लेखणे चुकीचे मानले आहे. (‘खोटे बोल; पण रेटून बोल’, ही म्हण सार्थ करणारे शरीफ ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) प्रत्येक धर्माच्या अनुयायांना समान संधी प्राप्त व्हावी आणि त्यातून त्यांनी स्वत:ला आणि आपल्या कुटुंबियांना चांगले जीवन मिळवून द्यावे, असेच मला वाटते. पाकिस्तानात सर्वांसाठी शांती आणि सुरक्षा असावी असेही आपल्याला वाटते. (आतंकवाद्यांवर आणि धर्मांधांवर आळा घातल्यास हे शक्य होईल ! ते करण्याची धमक शरीफ यांच्यात आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात