पाश्चात्त्य देशांतील चर्चमधील अनैतिकतेविषयी भारतातील प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक मौन बाळगतात; कारण यांतील बहुतांश प्रसारमाध्यमांचे मालक ख्रिस्ती आहेत !
रोम (इटली) : इटली देशातील अनेक चर्चमध्ये लैंगिक स्वैराचाराच्या मेजवान्या (ऑर्गी), अश्लील चित्रफीतींचे प्रदर्शन आणि वेश्याव्यवसाय चालू असल्याचे आरोप झाल्याने त्याच देशात असलेल्या व्हॅटिकन या सर्वोच्च संस्थेला आणि स्वत: पोप यांना धक्का बसला आहे. (प्रेम आणि शांती यांचे पुजारी असणार्या पाद्य्रांचे खरे स्वरूप जाणा ! जगभरातील चर्चमधील ही अवस्था पाहून चर्च म्हणजे स्वैराचाराचा अड्डा म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. नेपल्स शहरातील सांता मारिया चर्चच्या पाद्य्राने समलैंगिक स्वैराचाराची मेजवानी आयोजित केली होती. त्यात बाहेरून व्यक्तींना पैसे देऊन बोलावण्यात आले होते. एका निनावी पत्राने ही गोष्ट उघडकीस आल्याने चौकशी चालू झाली आहे.
२. उत्तर इटलीत पडूआ येथील ४८ वर्षीय रेव्हरंड अन्द्रेया कोन्तीन यांच्या ३० प्रेमिका असून त्यातील काहींना घेऊन ते फ्रान्स येथील पर्यटनस्थळी गेले होते. या घटनांची स्वीकृती त्यात सहभागी असलेल्या एका महिलेने दिली.
३. रेव्हरंड अन्द्रेया कोन्तीन यांनी स्वैराचाराच्या अनेक मेजवान्या आयोजित केल्या होत्या आणि त्यात सहभागी होण्यासाठी इतर चर्चमधील धर्मगुरूंनाही आमंत्रित केले होते.
४. वर्ष २०१४ मध्ये अल्बेंगा-इम्पेरीया चर्चच्या धर्मगुरूंनी स्वत:ची नग्न छयाचित्रे अश्लील (पॉर्न) संकेतस्थळांवर प्रकाशित केली होती.
५. या सर्व घटनांकडे पोप हताशपणे बघत आहेत. या घटना कशा थांबवता येतील आणि ख्रिस्ती धर्माची अपकीर्ती कशी दूर करता येईल, यावर सर्वोच्च स्तरावर विचार चालू आहे; मात्र एका तज्ञाच्या मते काही केले, तरी असे प्रकार थांबणे शक्य नाही, त्यासाठी धर्मगुरूंची निवड करतांनाच काही निर्बंध घातले गेले पाहिजेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात