पनवेल : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षणाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आरंभीच्या सत्रात आधुनिक वैद्य अशोक तांबेकर यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. ‘प्रथमोपचार शिकणे काळाची आवश्यकता’ आणि ‘प्रथमोपचार करणार्या आवश्यक असणारे गुण’ यांविषयी श्री. मनीष माळी आणि सौ. मानसी उथळे यांनी मार्गदर्शन केले. दुसर्या सत्रात प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये रुग्णाची पडताळणी, जखमेवर पट्टी कशी बांधावी आदी कृती शिकवण्यात आल्या. या कार्यशाळेला ६० जणांची उपस्थिती होती.
क्षणचित्रे
१. ‘प्रथमोपचार’ आणि ‘आपत्काळातील संजीवनी’ यांविषयीच्या सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते.
२. प्रथमोपचाराच्या सी.पी. आर. पद्धतीचा दृश्यपट दाखवण्यात आला. प्रथमोपचार पेटी कशी असावी आणि तिच्यातील साहित्य यांची तोंडओळख करून देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात