Menu Close

धूलिवंदनच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचा समाजोपयोगी उपक्रम

दुखापतग्रस्तांवर प्रथमोपचार वाहनातून प्रथमोपचार आणि प्रबोधन

मुंबई :  धूलिवंदनाच्या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने बोरिवली आणि घाटकोपर येथे प्रथमोपचार वाहन फिरवण्यात आले.

घाटकोपर

मुलुंड येथील भाजपचे नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली. होळीच्या निमित्ताने घडणार्‍या गैरप्रकारांविषयी प्रथमोपचार वाहनातून मेगाफोनद्वारे प्रबोधन करण्यात आले. रणरागिणी शाखेच्या आधुनिक वैद्या जागृती गुलाटी, परिचारिका सौ. आशा गंगाधरे, सौ. नयना भगत आणि सौ. राघवी कोनेकर उपस्थित होत्या.

बोरिवली

दुचाकीवरून पडलेल्या एका तरुणीवर आणि बोटांना दुखापत झालेल्या तरुणावर समितीच्या परिचारिका सौ. नमिता दुखंडे यांनी प्रथमोपचार केले. या वेळी रणरागिणी शाखेच्या परिचारिका सौ. नमिता दुखंडे आणि कु. शिवानी किर उपस्थित होत्या

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *